नळदुर्ग , दि .२७ : 


नळदुर्ग  येथे संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आले असून संविधान दिनाचे औचित्य साधून येथील बसस्थानका समोरील चौकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक या  नामकरणाच्या फलकाचे भिमसैनिकानी केले आनावरण 


  सार्वजनिक संविधान गौरव समिती नळदुर्गच्या वतीने येथील बसस्थानका समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात ७२ व्या संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
 या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी  नगरसेवक नितीन कासार हे  तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक, शहबाज काझी , विनायक अहंकारी,बशवराज धरणे, शिवसनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण,तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहर प्रमुख संतोष पुदाले,महिला काँग्रेसच्या  कल्पना गायकवाड,
आदी उपस्थित होते.
   
प्रारंभी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले . 


दि . २६ नोव्हेंबर २००८ मध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व दिवंगत नगरसेवक दयानंद बनसोडे यांना  श्रध्दांजली वहाण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
 

याप्रसंगी  सपो उपनिरिक्षक सरपाळे , सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,शाम कनकधर काँग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोद कांबळे  , रिपाइंचे  मराठवाडा विभाग सदस्य दुर्वास बनसोडे ,  जिल्हा सचिव एस के गायकवाड , चंद्रकांत बनसोडे,   युवा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे आदींची प्रमुख उपस्थित होती.


   याकार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण लोखंडे  तर सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी केले , जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यानी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले.तर परिसरातील भिम शाहीरानी दिवसभर प्रबोधनपर भिम गितगायन करून संविधानाचा गौरव केला.
   याकार्यक्रमाच्य यशस्वीतेसाठी दिपक निकाळजे ,  तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड रिपाइंचे ( गवई ) तालुका अध्यक्ष प्रमोद लोंढे, सिद्धांत बनसोडे , योगेश सुरवसे, प्रशिक बनसोडे , सुरज कांबळे  ,राकेश बनसोडे , अजयकुमार बागडे ,अमोल कांबळे , पपू कांबळे किशोर बनसोडे  गणेश बनसोडे , दिलीप भांगे , कुमार सुरवसे , गौतम गायकवाड अमर बनसोडे राजरत्न बनसोडे , वैभव कांबळे , आदीनी परिश्रम घेतले . अजय बागडे यांनी आभार  मानले.
 
Top