मुरुम , दि .२६ : 

श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी संविधान उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या  सुरुवातीस  महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. अशोक सपाटे  यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले .यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून उपप्राचार्य डॉ.सी टी बिराजदार  तर अध्यक्ष म्हणून एन एस एसचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ रवि आळंगे होते. 


 प्रा गोपाळ कुलकर्णी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून त्याचा अर्थ उपस्थित विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सांगितला, तसेच डॉ.संध्यां डांगे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगून लोकशाहीचा अर्थ व व्याख्या सांगितल्या व 26 /11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रम अधिकारी डॉ रवि आळंगे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मन पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा राजमाने यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा डॉ पंचगल्ले सुधीर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top