लोहगाव , दि . २६ :
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे शुक्रवार दि.२६ रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जेतवन बुध्दविहारामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचे पूजन ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच ग्रामपंचायत कार्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच प्रशांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सौदागर दबडे,विजय बिराजदार,गुंडू दबडे, हणमंत लांडगे, अरविंद दबडे,परमेश्वर लोखंडे,राम कांबळे,लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत गायकवाड,रमेश गायकवाड,अमोल गायकवाड,
गंगाधर कांबळे,खंडू बनसोडे,अतुल लोखंडे,महेश लोखंडे,लक्ष्मण बनसोडे,आदित्य बनसोडे, यांच्यासह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.