तुळजापूर, दि.२६
गेली २-३ वर्षापासून कोविड-१९ च्या परिस्थीतीमध्ये निर्माण झालेल्या बेरोजगारी, आर्थिक तणाव यामुळे अडचणीत आलेल्या पाल्य व पालकांना उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर यांनी गेली 4 वर्षापासून सुरु असलेल्या MHTCET 2021 च्या गुणांनुसार प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना २५ टक्के ते १०० टक्के पर्यंत सवलत देण्यास मान्यता दिली आहे.
तसेच प्रथम वर्ष प्रवेशार्थी विद्यार्थीनींना एक वर्षासाठी मोफत वसतिगृह सुविधा यास मान्यता दिली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.डी. पेरगाड यांनी शुक्रवार रोजी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवी मुदकन्ना व प्रवेश प्रमुख प्रा. प्रदीप हंगरगेकर उपस्थित होते. ग्रामीण भागातील होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण देवून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा उद्देश असून, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर यांच्या भक्कम पाठींब्याने महाविद्यालयाने विविध इमारतीचे नुतनीकरण व रस्त्यांची दुरुस्ती, विविध प्रयोग शाळामध्ये मोठया प्रमाणावर यंत्र सामुग्री खरेदी केलेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांव्दारे अभियांत्रिकी शिक्षण देवून, गेल्या ३८ वर्षापासून अंदाजे आठ हजारच्या वरती अभियंते महाविद्यालयाने निर्माण केले असून ते सर्व राष्ट्र निर्मीतीच्या कार्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत.
महाविद्यालयामध्ये सुसज्ज ग्रंथालय, ईंटरनेट सुविधा व अद्यावत वसतिगृहे, विमासंरक्षण तसेच वैद्यकिय सुविधा उपलब्ध आहेत.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या चमकदार कामगिरीमुळे महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या ७९ टक्के विद्यार्थ्यांनी TCS, Cognizant , Infosys, Capegemini, L & T, Shirke अशा नामांकीत खाजगी कंपन्या तसेच MPSC व्दारे महाराष्ट्र शासनामध्ये नोकऱ्या मिळविल्या आहेत. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजीत केले जातात. याव्दारे विद्यार्थी व विद्यार्थीनींचे व्यक्तीमत्व विकसीत होत आहे. तरी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवून नमूद सुविधेचा लाभ घेवून व्यक्तीमत्व विकास साधुन स्वत:ची सर्वांगीण प्रगती साधावी असे आवाहन प्राचार्य डॉ.एन.डी. पेरगाड, प्रवेश प्रमुख प्रा.पी.ए. हंगरगेकर व प्रा.पी.टी. सुर्यवंशी यांनी केले आहे.