नळदुर्ग , दि . २६ : सुहास येडगे

 नळदुर्ग शहर भाजपचे अध्यक्ष पद्माकर घोडके यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो म्हणणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी म्हणुन नळदुर्ग शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले असुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नागरीकांनी केली आहे.



नळदुर्ग शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत, मात्र हे कामे आंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे दिसुन येत आहे, त्यामुळे शहरातील राष्ट्रीय महामार्ग ते शास्त्री चौक पर्यंतचा मुख्य रस्त्याचे काम सध्या करण्यात येत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुस नाली बांधकाम करून नालीवर छत टाकुन त्यावर फुटपाथ करण्यात येणार आहे व रस्त्याच्या मधोमध दुभाजक करण्यात येणार आहे. दरम्यान नालीचे काम आर्धवठ सोडुन संबंधीत ठेकेदार हा दुभाजक बांधकाम करण्यासाठी सुरुवात केली असता शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके यांनी संबंधित ठेकेदारास रस्त्याच्या बाजुच्या नालीचे बांधकाम पुर्ण करून मगच दुभाजकाचे काम करावे असे सांगितल्याने संबंधीत ठेकेदार यांनी पद्माकर घोडके यांना खंडणी मागितली म्हणुन गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराची शहरातील जबाबदार व्यक्तींना होत असलेली अरेरावी थांबविण्यासाठी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी दि. २५/११/२०२१ रोजी रात्री येथील लोकमान्य वाचनालयाच्या सभागृहात सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती.


 या बैठकीत सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी  नगरसेवक शहबाज काझी, माजी नगरसेवक संजय बताले, माजी नगरसेवक सचिन डुकरे,पत्रकार सुनील बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर शेख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष महेबुब शेख, युसुफ शेख, सतीश पुदाले, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, मनसेचे जिल्हा सरचिटणीस जोतिबा येडगे आदींनी मनोगत व्यक्त करून संबंधीत ठेकेदाराचा निषेध व्यक्त करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर संबंधीत ठेकेदाराने पद्माकर घोडके यांची माफी मागुन आता विकास कामावर पालिकेचा कायम स्वरुपी आभियांता ठेऊनच कामास सुरुवात करावी असेही म्हंटले आहे.  

त्याचबरोबर ठेकेदाराने शहरात सुरू केलेल्या कामावर काम सुरू होण्यापूर्वी आंदाज पत्रकाचा फलक लावणे बंधनकारक होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे या पुढे सगळ्या कामावर ठेकेदाराने नागरीकांच्या महितीस्तव अंदाज पत्रकाचे फलक लावुनच काम चालु करावे अशी मागणी यावेळी करण्यात  आली. दरम्यान बैठक संपल्यानंतर तेथुन पोलीस ठाण्यात जाऊन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी म्हणुन पोलीस उपनिरीक्षक एम. एम. शहा यांच्याकडे नागरीकांनी निवेदन दिले.

 या बैठकीला  नगरसेवक उदय जगदाळे, शहबाज काझी, बसवराज धरणे, माजी नगरसेवक संजय बताले, सचिन डुकरे, सुधीर हजारे, शहर भाजपचे अध्यक्ष पद्माकर घोडके, एम आय एम चे युसुफ शेख, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, सामाजिक कार्यकर्ते आझहर जहागीरदार, बशीर शेख, मनसेचे जिल्हा सचिव जोतिबा येडगे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, मनसेचे शिवाजी सुरवसे, व्यापारी मंडळाचे मुकुंद नाईक, सुभाष कोरे, समीर बाडेवाले, पप्पू पाटील, सिकंदर काझी, मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुनील  बनसोडे, सतीश पुदाले,आजीत जुनैदी, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी संबंधीत ठेकेदारावर कारवाई नाही झाल्यास या पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही देण्यात आला.
 
Top