तुळजापूर , दि .२६
वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून 17 सदस्यांची राज्यस्तरीय समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केली असून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक नेते प्रोफेसर डॉ. गोविंद काळे यांची या महत्त्वाच्या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या शिफारस समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. .डी.आर माने, विधान परिषदेचे नऊ आमदार, वरिष्ठ महाविद्यालयीन विविध प्राध्यापक संघटनेचे सहा पदाधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सात प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष तथा 25 वर्षांपासूनचा 1992 ते 2000 पर्यंतच्या बिगर नेट/सेट प्राध्यापकांचा प्रलंबित नेट/सेट प्रश्नासाठी विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्र शासन व न्यायालयीन पातळीवर सतत संघर्ष करून न्याय हक्क मिळवून देणारे नेट/सेट संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रो.डॉ.गोविंद काळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.तसेच नेट/सेट संघर्ष समितीतील डॉ.किशोरी भगत व डॉ. विजय किसन हिले यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
नेट/सेट संघर्ष समितीतील तीन सदस्यांची राज्यस्तरीय समितीत नेमणूक करण्यात आल्यामुळे प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्या बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रा.डॉ.गोविंद काळे यांच्या नियुक्तीमुळे प्राध्यापकांमध्ये प्रचंड समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करीत असल्याबद्दल प्राध्यापकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या तीन सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे शिवसेना नेते.ना.सुभाष देसाई , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ना. ज. मो. अभ्यंकर यांचे नेट/सेट संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.