नळदुर्ग , दि . ५ : विलास येडगे

नळदुर्ग शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकान फोडुन ४ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्याला अवघ्या कांही तासात गजाआड करून चोरीला गेलेली रक्कम त्याच्याकडुन हस्तगत करून दैदिप्यमान कामगिरी करणारे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव व नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.


   दि.२ व ३ नोव्हेंबर च्या रात्री   शहरातील मुख्य बाजारपेठेत असणारे "गुरू कृपा किराणा दुकान" फोडुन अज्ञात चोरट्याने दुकानाच्या तिजोरीतील ४ लाख रुपये चोरून नेले होते.ऐन दिवाळी सणात ही चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. तसेच चोरट्यांना पकडण्याचे फार मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे होते. तुळजापुरच्या पोलिस उपअधीक्षक श्रीमती सई--भोरे--पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, सपोनि सुधीर मोटे, शिवाजी तायवाडे यांनी या चोरीचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या सहाय्याने पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून अवघ्या कांही तासात या चोरीचा छडा लाऊन चोरट्याला गजाआड करून चोरीला गेलेली रक्कम चोरट्याकडून हस्तगत केली.


   पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. दि.४ नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव व नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने कौतुकास्पद कामगिरी करणारे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, सुधीर मोटे व शिवाजी तायवाडे यांचा पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे जीविशाचे धनंजय वाघमारे आदीजन उपस्थित होते.
 
Top