तुळजापूर , दि . २४ : उमाजी गायकवाड
स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण विचाराला पुढे घेऊन जाणारे एक ध्येयवादी शिक्षण प्रसारक आणि शिक्षण प्रसारातून समाज परिवर्तनाचे स्वप्न पुर्ण करणारे एक दृष्टे समाजहितचिंतक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्प संस्थापक शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी मराठवाडाच्या प्रवेशद्वारी, बालाघाटाच्या डोंगररांगेत तथा आई तुळजाभवानीच्या तिर्थ क्षेत्रात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे तुळजाभवानी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे रोपटे तुळजापूरात 1971 मध्ये रोवले. तो आता वटवृक्ष झाला आहे.
या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 हे महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची रुप रेषा स्पष्ट करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मणेर यांनी बुधवार दि. 24 रोजी सकाळी महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रास्ताविकात प्रा.डॉ.एस.एम.देशमुख यांनी 50 वर्षांपूर्वी बालाघाटाच्या डोंगररांगेत शिक्षणाच्या फारशा सुविधा नसताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुळजाभवानीच्या पावण भूमीत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने तुळजाभवानी कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात झाल्याचे सांगून अगदी प्रतिकूल अवस्थेत सुरू झालेले या महाविद्यालयाने 50 व्या वर्षात पदार्पण केले असून यशाच्या 51व्या वर्षांची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. तुळजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी येत असून सध्या जवळपास 1300 विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे घेत आहेत. संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम तुळजाभवानी महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरु असून तुळजापूरच्या राजकारणात, समाजकारणात तसेच व्यवसायात पारंगत असलेले विद्यार्थी बहुतांशी याच महाविद्यालयातून घडल्याचे सांगितले.
कोविड 19 च्या महामारी संकटामुळे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी उशिर झाला असला तरी महिनाभरात उद्घघाटन सोहळा व समारोपाचा कार्यक्रम पालकमंत्री, सांस्कृतिक मंत्री, खासदार, आमदार,नगराध्यक्ष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या महोत्सवासाठी महाविद्यालयात तयारी सुरू आहे. गुणवत्तेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिकतेचा स्वीकार करणे गरजेचे असून महाविद्यालयाच्या सर्वांगीन विकासासाठी अंतरंग व बाह्यरंग सुशोभीकरण भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे अगत्याचे असल्याचे महाविद्यालय सल्लागार समितीतील खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष सचिन रोचकरी व विकास समितीतील सदस्यांनी सुचित केले आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्राचार्य डॉ. एस.एम. मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास समितीसह सल्लागार समिती, निधी संकलन समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, स्मरणिका समिती, कार्यकारी समिती, जाहिरात समितीचे गठण करण्यात आले आले. या समितीद्वारे विविध कार्यक्रम घेतले जाणार असून यामध्ये प्रामुख्याने परिसंवाद, व्याख्यानमाला, ऐतिहासिक प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, माजी विद्यार्थी पालक मेळावा, असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जाणार आहेत.सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी एकत्रित येणार आहेत. तसेच पुढे बोलताना प्रा.डॉ.एस.एम. देशमुख यांनी सांस्कृतिक वारसा लाभलेल्या तुळजापूर सारख्या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृह नसल्याची खंत व्यक्त करून सांस्कृतिक सभागृह उभे करण्यासाठी महाविद्यालयाच्या मालकीची जागा उपलब्ध असून सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठ लोकप्रतिनिधींनी भरीव तरतूद करुन पुढे येण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त करुन महाविद्यालय कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या पगारातून पाच लाखांचा निधी संकलित केला असल्याची माहिती देऊन महाविद्यालयाच्या विधायक कामासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या स्वामी विवेकानंदाचा पुतळा महाविद्यालयासमोरील नगरपालिकेच्या त्रिकोणी जागेत हस्तांतरित करण्यात यावे, यासाठी मंगळवार दि. 23 रोजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचेकडे निवेदन दिले असून स्वामी विवेकानंदांचा पुतळा हस्तांतरित करण्यासाठी नगरपालिकेने महाविद्यालया समोरील जागा उपलब्ध करून द्यावी
प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर
यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम. मणेर, प्रा.डॉ एस.एम. देशमुख, प्रा. विवेकानंद चव्हाण,प्रा.धनंजय लोंढे, प्रा. जे.बी. क्षिरसागर पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.