तुळजापूर , दि .२४ : 


तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथे राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 52 वर  बुधवार दि. 24 रोजी सकाळी 7 वाजनेच्या सुमारास सांगवी (मार्डी) येथे ऊसाने भरलेला ट्रॅक्टरला कट मारल्याने  खाद्यतेलाचा टँकर पलटी होऊन खाद्यतेल संपूर्ण रोडवरती पसरले होते. 

यावेळी तेल घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. याअपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. खाद्यतेलाचा टँकर क्र. जी.जे.36 T.5944 खाद्यतेलाचे टँकर सोलापूरच्या दिशेने जात असताना सांगवी (मार्डी) नजिक आला असता ऊसाने भरलेला ट्रॅक्टरला कट मारल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदरशी नागरिकांमधून समजते.

 घटनास्थळी तुळजापुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेंनशेट्टी,बीट अंमलदार राठोड, आयआरबीचे कर्मचारी व तुळजापूर नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस  कर्मचारी व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. जवळपास तीन तासांपर्यंत या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल तीन तासांनंतर वाहतूक सुरळीत चालू झाली.
 
Top