चिवरी: (राजगुरू साखरे): 

तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी येथील १८ वर्षा पुढील शंभर टक्के ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शंभर टक्के लसीकरणाची मोहीम राबवण्यात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला यश आले आहे. 

तुळजापूर तालुक्यातील  अणदुर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या उमरगा चिवरी येथील  उपकेंद्रांमध्ये सतत लसीकरणाची कॅम्प घेऊन तसेच नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करून गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले आहे तसेच या मोहिमेला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये गावातील शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. 


हे लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बडे, डॉ. मलय्या स्वामी, सरपंच स्वाती दूधभाते, उपसरपंच अण्णाराव कदम ,ग्रामसेवक गोरोबा गायकवाड,  आशा कार्यकर्ती अनिता भोसले , आरोग्य सेवक निखिल डांगे, पोलीस पाटील महेश पाटील, अंगणवाडी कर्मचारी , आदींनी लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता.


              
गावात लसीकरणाचे महत्त्व पटवून देत जनजागृती करून गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले आहे, गावातील आरोग्य केंद्रामध्ये लस उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.                
 ग्रामसेवक : गोरोबा गायकवाड
   
      
 
Top