तामलवाडी, दि. २४ 

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडपट्टी सुरतगाव ता. तुळजापूर येथे सुरतगाव केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख राजेश धोंगडे यांनी या प्राथमिक शाळेस भेट देवुन पाहणी केली.  


 येथील नयनरम्य परिसर, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणवत्ता ,कार्यालयीन अभिलेखे ,पालकांच्या सहमतीने ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण, विद्यार्थी उपस्थिती व शाळेच्या झालेल्या संख्यात्मक व गुणात्मक वाढ या सर्व गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर व या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.      
 
 याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सी .आर .  सूर्यवंशी व सहशिक्षक ए. एस .मगर   यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केंद्रप्रमुख धोंगडे यांचा सत्कार  केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबा मगर यांनी मानले.
 
Top