तुळजापूर , दि .२५ 


पुणे जिल्ह्यातील भोर येथे महाराष्ट्र मराठा सोयरिक गृपच्या वतीने तथा या संकल्पनेचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ बागल (कुर्डुवाडी) उपाध्यक्ष मनोजकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  विनाशुल्क राज्यस्तरीय मराठा  वधू-वरांचा थेट-भेट परिचय मेळाव्याचे आयोजन दि.5 डिसेंबर 2021 रोजी   येथील अभिजित मंगल कार्यालयात करण्याचे बुधवारी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. 



पुणे जिल्ह्यातील भोर येथील अभिजित मंगल कार्यालयात सकाळी 9 ते 5 या कालावधीत होणार असून हा पुणे जिल्ह्यातील पहिलाच मेळावा असल्याची माहिती मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ बागल यांनी  दिली. पुणे जिल्ह्यातील मराठा समाजातील  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व सोयींनी युक्त विनाशुल्क मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीकोनातून विचार विनिमय करून मेळाव्यातील समित्यांचे गठण करण्यात आले व प्रत्येकाकडे कामाच्या जबाबदाऱ्या देण्यात येऊन मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. 


तसेच महाराष्ट्र मराठा सोयरिक या नावाने सोलापूर, उस्मानाबाद, उदगीर, पुणे, कोल्हापूर,सांगली या जिल्ह्यात 128 व्हाट्स अप गृप कार्यरत असल्याची माहिती बागल यांनी दिली. तसेच या मेळाव्याचे उद्घघाटन मराठा समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

     या  राज्यस्तरीय मराठा  वधू-वर थेट भेट परिचय मेळाव्याच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून वधू-वर उपस्थित राहणार असल्याने आपल्याला  आपल्या इच्छा प्रमाणे जोडीदार शोधता येणार असून अनुरूप वधूवरांना त्यांची ओळख, माहिती सांगून जोडीदाराबद्दल असणार्‍या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार निवडता येणार असून या मेळाव्यात वधूवरांनी आपल्या पालकांसोबत स्वतःचा फोटो व बायोडाटा घेऊन हजर राहावे  असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने नागनाथ बागल, मनोजकुमार गोरे यांनी केले आहे.
    या मेळाव्यात मराठा समाजातील इच्छुक वधूवरांनी  बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. रामदास सुरवसे, कुमकर, प्रा.सौ.गायकवाड  प्रा.महाडिक, प्रा.पाटील, शिंदे  थोपटे , गोरड ,संजय शिरवले, वाडकर , पवार , संजय खरमरे, राजिवडे ,  खाटपे, लेकावळे,अमर बुदगुडे, दिघे, गोळे , प्राचार्य रवी सुरवसे, गणेश गवळी,बजीरंग दत्तू , श्रीमती प्राजक्ता बागल,सौ. अर्चना कवाडकर,अजय पाटील,            राजेंद्रपाटील, सुधीर  भोसले, उत्तम अमृतराव (तुळजापूर) ,सतीश काकडे, अनंतराव शिंदे, वसंत मस्के, माधवराव गंभीर,सुखदेव यादव, मोहन वाघ,टी पी गायकवाड, शिवश्री दत्ता शिंदे, सूरज पाटील,पंकज पिंगळे,अनंतराव सूर्यवंशी, पत्रकार दिनेश मडके ,   पत्रकार उमाजी गायकवाड, औदुंबर ढावरे यांनी केले आहे
  
      
 
Top