काटी ,दि .२५

ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता   पाचवी मध्ये जि.प.प्रा.शाळा पांगरदरवाडी ता . तुळजापूर  येथील विद्यार्थिनी कु.अनुजा शांताराम कुंभार हिने 186 गुण प्राप्त करीत  शिष्यवृत्ती पात्र ठरली आहे.


2021 च्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेतही तिने यश संपादित करुन ती नवोदयधारक झाली आहे.तिच्या ह्या यशाबद्दल काटी बीटचे विस्तार अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी श्री.अर्जुन जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शंकर कदम,शाळेचे मु.अ.श्री. उत्तरेश्वर पैकेकरी, केंद्रप्रमुख श्री. राजेश धोंगडे,वर्गशिक्षक श्री.शांताराम कुंभार, मार्गदर्शक श्री. हर्षवर्धन माळी,नानासाहेब कोळी,अनिल हंगरकर,शहाजी कोळी, श्रीम.अनिता माने  यांनी अभिनंदन केले.
 
 कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती मुळे शाळाबंद व प्रत्यक्ष शिक्षण घेण्यातील अडचणींमुळे तसेच शिष्यवृत्ती परीक्षा आयोजनातील वारंवार झालेले बदल यांमुळे निकालाची टक्केवारी खूप खाली आली.संपूर्ण राज्याची पाचवी वर्गाची शिष्यवृत्ती पात्र टक्केवारी ही 16.99 टक्के  तर उस्मानाबाद जिल्ह्याची टक्केवारी ही 9.34 टक्के  आहे.
 
Top