जळकोट,दि.२५ :
नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.०३ डिसेंबर रोजी भुजबळ नॉलेज सिटी आडगाव,नाशिक येथे आयोजित केले असून कवीकट्टा मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या असलेल्या सध्या औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या कवयित्री संध्याराणी जयहिंद कोल्हे यांच्या सुनी सुनी वाटे तुझी पंढरी या कवितेची निवड झाली आहे.निवड झालेल्या कवितांची मैफिल दि.५ डिसेंबर २१ रोजी सकाळच्या सत्रात भरणार आहे. त्याबद्दल ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संपर्क समिती सदस्य वैजयंती सिन्नरकर नाशिक यांनी पत्राद्वारे कळवले आहे .
कवयित्री संध्याराणी कोल्हे यांनी विविध
संमेलनात सहभाग नोंदवलेला आहे.भरतीय संस्कृतीला अनुसरून बहूसंख्य काव्य रचना सादर केल्या आहेत.अनेक पुरस्काराने सन्मानित, लिखाणाचा छंद जोपासीत त्यांनी षटकोळी हा नव काव्य प्रकार साहित्याची निर्मिती केली आहे.
षटकोळी साहित्यप्रेमी समूहाची स्वतः स्थापना करुन नवोदित कवीना त्या साहित्याची सेवा अविरपणे करत आहेत. यापुर्वी त्यांच्या समूहाची दोन ऑफलाईन व चार ऑनलाईन काव्यसंमेलने यशस्वीपणे पार पडलेली आहेत. कवीकट्टासाठी कवितेची निवड झाल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित या कवयित्रीचे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.
यापुर्वीच्या ९३वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, उस्मानाबाद कवीकट्टा मध्ये त्यांच्या मला पंख असते तर या कवितेची निवड झाली होती.