वागदरी , दि .३ : एस.के.गायकवाड
आष्टा (कासार) ता.लोहारा येथील मुळ रहिवासी असलेले व सध्या पुणे येते वास्तव्य करून राहत असलेले बुद्ध-फुले- शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत साहित्यिक डॉ. डि.टी.गायकवाड यांना पुणे येथील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्थेच्या वतीने "ग्रंथ" पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
डॉ. डी.टी.गायकवाड हे केंद्र शासनाच्या केंद्रीय जल व विद्दुत संशोधन केंद्र पुणे येथून ग्रंथपाल व माहिती आधिकारी म्हणून सेवा निव्रत्त झाले असून त्यानी अतापर्यत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर १७ पुस्तके प्रकाशित केलेले आहेत. त्यापैकी "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान आशय आणि विश्लेषण" या पुस्तकास सदर संस्थेच्या वतीने ग्रंथ पुरस्कार मिळाला असून नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र काँस्मोपाँलिटन एज्युकेशन सोसायटीचे पुणे चे अध्यक्ष डाँ पी.ए.इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ परभणीचे माजी कुलगुरू डॉ.पी.बी.विद्यासागर यांच्या हस्ते डॉ. डी.टी.गायकवाड यांना ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी संस्थेचे एस.जी.भंडारे, डॉ.दिपक गायकवाड,एस.एम.डावरे,डॉ.सुरेश कठाणे,वसंत नरवाडे, अँड. एल.टी.सावंत, तुकाराम डावरे, प्रभाकर वाघमारे,प्रा.राजा सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे आदी उपस्थित होते.
डॉ. डी.टी.गायकवाड यांना सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल एस.के.गायकवाड, भैरवनाथ कानडे, सुरेश लोंढे, डॉ. प्रा.एम.एन.गायकवाड, चंद्रकांत शिंदे, आर.जी.गायकवाड, उमेश कांबळे,सह मित्रपरिवारानी त्यांचे आभिनंदन केले आहे.