जळकोट,दि.३ :मेघराज किलजे

कोरोनाच्या कडक  लॉकडाऊन काळात अणदुर मधील अत्यंत गरजु मंडळींना  १२२ दिवस घरपोच जेवण अभियान राबवले होते. त्यावेळी अनेक हात सढळ झाल्याने  यातील मंडळींना मोठा दिलासा मिळाला होता.                        
          

 आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, मानवी जीवन गतिमान होत आहे. मात्र एकल, निराधार , वयोवृद्ध मंडळीच्या जीवनात काही प्रमाणात हालअपेष्टा असल्याचे ओळखून घरपोच जेवण अभियानातील गरजुसह ,१०० जणांना अणदूर येथील शिक्षिका वंदना चौधरी -अवताडे   व प्रतिक्षा स्वामी  यांनी दिवाळीचा फराळ वितरित केला आहे. यावेळी साहेबराव घुगे,म्हाळाप्पा घोडके,काशीनाथ चुगे ,पशु मुळे, विश्वनाथ लोंढे  ,आनद मिटकरे उपस्थित होते.
  घरपोच जेवण अभियान, दिवाळीचा फराळ आदी बाबीतुन या शिक्षिका समाजाप्रती  सेवाभावाची जपणूक करीत आहेत.                    वंदना  चौधरी -अवताडे   व प्रतिक्षा स्वामी   या शिक्षिकेनी दाखवलेल्या सेवावृत्तीबद्दल सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top