काटी , दि . २५  : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी सावरगाव येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. 30 डिसेंबर रोजी करण्यात आले असून सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व श्रावक श्राविकानी याचा धर्म लाभ घ्यावा. असे आवाहन मंदिर समितीचे पद्मकुमार मेहता व डॉ. आदर्श मेहता यांनी केले आहे.



सकाळी 9 ते 9:30  ध्वजारोहण 9:30ते10;30,कुंभमेला 10:30 ते1:00, भगवंत अभिषेक पूजा व विधान 1:00ते 2:30, मिष्ठान्नभोजन 2;30 ते4:00, पालखी मिरवणूक सोहळा 4:00 ते 5:00 आचार्य श्री यांचे प्रवचन होणार आहे.
      

यावेळी परम पूज्य आचार्य 108 सुयश सागरजी महाराज परम पूज्य 108 सुहितसागरजी महाराज परम पूज्य 108 सुशांत सागरजी  महाराज  यांच्या उपस्थितीत ही वार्षिक यात्रा संपन्न होणार असून यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे  व धर्म लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top