मुरुम , दि. १० :
मुरूम ता . उमरगा येथील व्यापारी संघटना व शहरातील माजी सैनिक यांच्या वतीने तमिळनाडू येथे दुर्घटनेत शहिद झालेले सेंट्रल डिफेन्स स्टाफचे प्रमुख बिपिन रावत व अन्य 13 भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील व्यापारी महासंघ व समस्त मुरूम वाशीयाकडून काल कुन्नूर तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहिद झालेले भारताचे लष्कर प्रमुख व सेंट्रल डिफेन्स स्टाफचे प्रमुख बिपिन रावत ,त्यांची पत्नी मधूलिका रावत व अन्य 12 सैनिक शहिद झाले असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील बसवेश्वर चौकात दि. 9 डिसेंबर रोजी सांयकाळी ठीक 5 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी आर एस बरकते ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक माळी ,जगताप मुरूम, माजी सैनिक विजयकुमार हिरेमठ , बब्रुवान जाधव , व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक मिनियार , राजशेखर मुदकांना ,ज्ञानेश्वर चौधरी , प्रशांत पाटील ,अमृत वरनाळे , मनीष मुदकांना , बाळासाहेब भालकाटे , काँग्रेस तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ , युवासेना शहर प्रमुख भगत माळी जगदीश निंबरगे , बाबा कुरेशी ,शरद स्वामी व समस्त मुरूमकरांनी उपस्थित राहत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानास मानवंदना देत श्रद्धांजली वाहण्यात आली .
रमेश बरकते उपविभागीय पोलीस अधिकारी ,उमरगा
त्यांच्या वाडीलाप्रमाणे त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा केली व देशाची सेवा करत आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या लष्कर प्रमुख( CDS) बिपिन रावत ,त्यांची पत्नी मधूलिका रावत व अन्य 12 शहिद झालेल्या जवानांच्या स्मृतीस शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना