तामलवाडी , दि १०
उस्मानाबाद भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे जिल्हा स्काऊट संघटक जनार्धन इरले यांची बीड येथे जिल्हा स्काऊट संघटकपदी बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आले.
त्यांच्या जागी सांगलीहून उस्मानाबाद येथे नुकतेच नियुक्त झालेले जिल्हा स्काऊट संघटक विक्रांत देशपांडे यांची नियुक्तीबद्दल त्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सुरतगाव ता. तुळजापूर केंद्रप्रमुख व स्काऊट मास्टर राजेश धोंगडे व सरस्वती विद्यालय तामलवाडीचे क्रीडाशिक्षक व स्काऊट मास्टर प्रभाकर जाधव तसेच जिल्हा गाईड संघटक श्रीमती अनुसया शिरसाट ,कनिष्ठ लिपिक श्रीमती सईदा नसरीन काझी, कार्यालय सेवक दत्तात्रय माने व इतर स्काऊट मास्टर्स, गाईडर उपस्थित होते .