तामलवाडी:- दि ११
येथील जिजाई माऊली मंगल कार्यालय तामलवाडी ता .तुळजापूर येथे चर्मकार समाजाच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 494 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी समानतेच्या तत्त्वांची मांडणी करणारे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत आपल्या भक्तिमार्गातून मातृ-पितृ सेवा व स्त्री पुरुष समानता तसेच अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती व खरी भक्ती तसेच मानव जीवन कसे जगावे याचे प्रबोधन करणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रभाकर जाधव, तामलवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच ज्ञानोबा राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग म्हेत्रे, विशाल राऊत, बाळासाहेब कांबळे, रामेश्वर कांबळे, विकास कांबळे , सहदेव हब्बु , गुंडू बनसोडे, श्रीकांत कांगडे , शत्रुघ्न राऊत ,किशोर बनसोडे, तानाजी पवार,पोपट चव्हाण, आबा रणसुरे, शीलवंत चौगुले, विशाल कसबे, सचिन माळी, सुदाम म्हेत्रे ,आदीसह समाज बांधव उपस्थित होते.