वागदरी , दि .११

      तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील अंबव्वा महिला मंडळाच्या अध्यक्षा कस्तुरा कारभारी यांना मराठवाडा लोकविकास मंच यांच्या वतीने देण्यात येणारा" सामाजिक कार्य गौरव पुरस्कार" देऊन गौरविण्यातआले.


 श्रीमती कस्तुरा कारभारी यांनी अंबव्वा महिला मंडळाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण ,महिला बचत गट, शेतकरी, एकल महिला या क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय असे संस्थात्मक व रचनात्मककार्य केले आहे. सदर उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने त्यांना अफार्म संस्थेचे माजी अध्यक्ष एम .एन .कोंढाळकर , मराठवाडा लोक विकास मंचचे  अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ,रमाकांत कुलकर्णी ,सामाजिक कार्यकर्त्या मंगल दैठणकर ,कालिंदी पाटील  ,अनिता तोडक रयांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पहार देऊन कारभारी यांना सन्मानित करण्यात आले .

यावेळी दत्ता बारगजे ,रमेश भिसे, प्रमोद झिंजार्डे, भैरवनाथ कानडे,आश्रुबा गायकवाड ,हरिचंद्र ढाकणे आदींची उपस्थिती होती ..
 
Top