चिवरी , दि .१२  राजगुरू साखरे

चिवरी ता . तुळजापूर  येथील शेतकऱ्यांला पिकविम्यापोटी मिळाले  चक्क प्रती हेक्टरी 1584 ₹ दोन वेळेस कंपनीकडे दावा करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा,    तुटपुंजी मदत पावसाच्या खंडामध्ये दावा केलेले अनेक शेतकरी पीक विमाच्या प्रतीक्षेतअसुन  विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याची 
संतप्त प्रतिक्रिया  नागरिकातुन व्यक्त होत आहे.


तुळजापूर तालुक्यातील चिवरी  परिसरात यंदा पेरणी योग्य वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी  जून महिन्यामध्ये  पेरणी आटोपुन घेतले . या परिसरातील  शेतकरी सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात. पिकांची वाढ ही जोमात झाली होती. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने ओढ  दिल्यामुळे खरिपातील सोयाबीन पिकाचे फुलधारणेच्या व फळधारणेच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सर्वश्रुत आहे . 


 सलग दोन वर्षांपासून या परिसरातील बळीराजाला अतिवृष्टीचा फटका बसत आहे, त्यामुळे शेतीचे  अतोनात नुकसान होऊन या वर्षीचे खरीप पिके पाण्यात गेले होते, अशा वेळेस शेतकऱ्यांनी विमा कंपनीने घालून दिलेल्या  जाचक अटी मान्य करून  वेळेत प्रक्रिया करून देखील येथील शेतकरी अंबाजी मारुती झिंगरे  यांनी त्यांच्या गट नंबर  18 या एक हेक्टर सहा आर क्षेत्रांमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती त्यानंतर अस्मानी संकटामुळे पिकाची नुसकान झाली असताना संबंधित शेतकऱ्यांनी नुकसानीसाठी संबंधित कंपनीकडे दोन वेळेस दावाही केला होता , संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनीही पीक नुकसानीचा पंचनामा केला होता. इतकी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असतानासुद्धा येथील शेतकऱ्याला नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुटपुंजी अशी  मदत घ्यावी लागली आहे. 


 सध्या 14000 ते 16000प्रती हेक्टर विमा वितरित करीत असताना , यांना मात्र 1584 ₹ इतका नुसकान भरपाई पोटी विमा मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील अनेक शेतकऱ्यांनी पावसाचा खंड पडल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये पिकाचे निम्म्याहून अधिक नुकसान झाले होते आणि सप्टेंबर आॅक्टोबंर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे  उरले सुरले सर्व पिके पाण्याखाली जाऊन प्रचंड नुकसान झाले असताना देखील विमा कंपनी शेतकऱ्यांना अशा प्रकारची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तात्काळ अशा शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित पिक विमा वाटप करण्यात यावा अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.      
                  माझ्या वडिलांनी एक हेक्टर सहा  आर या क्षेत्रावर सोयाबीन पिक विमा भरला होता, मी दोन वेळेस संबंधित कंपनीकडे दावा करून देखील कंपनीने आम्हाला केवळ 1584 ₹ दिले आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उर्वरित पिक विमा द्यावा.

                       
  सुधीर झिंगरे शेतकरी चिवरी.

मी माझ्या एक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकासाठी पिक विमा भरला होता , त्याचबरोबर कंपनीकडे दावाही करण्यात आला होता, संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी पीक पंचनामाही केलेला होता, परंतु आम्हाला नुकसानीपोटी तुटपुंजी मदत दिली आहे.
      
                          
 
Top