काटी , दि . १२
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. ११ रोजी सकाळी येथील माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या कार्यालयासमोर माजी सैनिक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाच्या तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका आणि सेनेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर काटी येथील बसस्थानक परिसरातील माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या कार्यालयासमोर माजी सैनिक व ग्रामस्थ यांच्या वतीने शोकसभा आयोजित करत देशाच्या तिन्ही दलाचे प्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी व अन्य सेनेतील उच्चपदस्थ अधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित माजी सैनिक व ग्रामस्थांनी बिपिन रावत अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.
यावेळी गावातील सर्व माजी सैनिक, सरपंच, उपसरपंच विद्यमान चेअरमन, माजी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.