नळदुर्ग , दि. २९ : 


 नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास येडगे यांची तर सचिवपदी सुनिल गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे.


         नळदुर्ग शहरात पहिल्यांदाच शहरातील सर्व पत्रकार एकत्रीत येऊन शहर पत्रकार संघटनेची स्थापना केली आहे. शहर पत्रकार संघटनेच्या सदस्यांची मंगळवार  दि.२८ डिसेंबर रोजी जेष्ठ  पत्रकार विलास येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सन २०२२ या वर्षासाठी संघटनेच्या कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यामध्ये नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणुन सुहास येडगे यांची तर सचिव म्हणुन सुनिल गव्हाणे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर संघटनेचे इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. उपाध्यक्ष आयुब शेख, श्रीनिवास भोसले, कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे व प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक आदीची निवड करण्यात आली. तर  सदस्य म्हणुन विलास येडगे, सुनिल बनसोडे,तानाजी जाधव,लतिफ शेख, उत्तम बनजगोळे, जहीर इनामदार,इरफान काझी,दादासाहेब बनसोडे,अजित चव्हाण, शोएब काझी,अनिल जाधवर, मुजम्मील शेख, किशोर नाईक विशाल डुकरे , प्रा. दिपक जगदाळे  यांची निवड करण्यात आली.
      

यावेळी सुनिल बनसोडे, आयुब शेख, श्रीनिवास भोसले, तानाजी जाधव व शिवाजी नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शहर पत्रकार संघटनेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम राबविण्याबरोबरच शहरात पत्रकारांसाठी घरकुल योजना तसेच पत्रकार भवन उभारले जावे यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील असे सांगितले.
 
Top