तुळजापूर, दि.२९,
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचा करिअर कट्टा हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी यशवंत शितोळे,अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, महाराष्ट्र शासन यांनी वरील उदगार काढले.
शितोळे बोलताना पुढे म्हणाले की, स्मार्ट मोबाईल आपण वापरत नाहीत तर आज मोबाईलच आपला वापर करत आहे, परिवारातील निर्माण झालेल्या या आभासी भिंती नष्ट होणे गरजेचे आहे, आजमितीला संगणक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी राईट टू डिस्कनेक्ट हे बिल संसदेत मांडले आहे, किमान दहा तास तरी मोबाईल किंवा तत्सम गोष्टींपासून लोक दूर राहून स्वत:शी संवाद साधू इच्छितात,आज महाराष्ट्रातील तरुण दिल्लीमध्ये जाऊन युपीएससी सारख्या परिक्षांची तयारी करतात, यामध्ये दिल्ली स्थित खासगी मार्गदर्शन केंद्राची फक्त फिसमधुन ५०० कोटींची उलाढाल होताना दिसुन येते.
मराठवाड्यातील विद्यार्थी हे कष्टाळु आहेत,आज त्यांच्या साठीच पुढचे पाऊल या संस्थेद्वारे ८५० सनदी अधिकारी एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाच्या वतिने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरिता मार्गदर्शन करत आहेत.आजचा युवा हा वायुच्या वेगाने स्वत:ला घडविण्यासाठी धावला पाहिजे असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर हे म्हणाले की,आज तरुणांनी नौकरी बरोबरच व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, कॉलेज कट्ट्यावर होणाऱ्या चर्चा या करिअर विषयीच असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन तळमळीने,जिद्दीने प्रयत्न केल्यास त्यांना हमखास यश मिळेल असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.
करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाविद्यालयातुन अभिषेक लसणे बी.कॉम, भाग एक,कु साखरा कांबळे बी.ए.भाग एक यांची ब्रॅण्ड ऍंबेसिडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली, यावेळी करिअर कट्टा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.नितिन पडवळ , तसेच तालुका समन्वयक प्रा जेटिथोर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.ए.बी वसेकर यांनी केले तर सूत्रसंचालन समन्वयक प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.गुंड बी.डब्ल्यू यांनी मानले.यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर उपस्थित विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक केले होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.