मुबंई ,दि. २८
महाराष्ट्र मराठा सोयरिकचे अटकेपार झेंडे,
हरियाणा पाठोपाठ मध्य प्रदेशातही "वधु-वर परिचय मेळावा"
29/01/2016 ला बुलडाणा शहरात सुरू झालेली महाराष्ट्र मराठा सारिकची
लोकचळवळ ही आता राज्यापुरतीच मर्यादिन न राहता अखिल भारतीय लोकचळवळ म्हणून अल्पावधीतच नावारूपास आलेली आहे. व बहुसंख्येने समाज बांधव स्वयंस्फुर्तीने या लोकचळवळीत हिरीरीने सहभाग
नोंदवित आपले समाजऋण फेडण्याचे कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.
नुकतीच महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रदेशातील बहाणपूर येथे दि.26/12/2021, रोज येथे मध्यप्रदेशातील समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा नियोजनार्थ
बैठक पार पडून बैठकीमध्ये मेळाव्याच्या आयोजन व नियोजना संदर्भात चर्चा होऊन मार्च अखेर मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
सदर मेळावा हा महाराष्ट्रात संपन्न झालेल्या 27 मेळाव्यांप्रमाणेच भव्य असा अखिल भारतीय स्वरुपाचा असणार आहे. सदर मेळाव्यामध्ये संपूर्ण भारतातील विखुरलेला मराठा समाज एकत्र आणण्याचा मानस बैठकीमध्ये जवंजाळ पाटील यांचा मनोदय आहे.
मध्यप्रदेशातील मराठा समाजाचे नेते श्री. रमेश पाटील यांनी बैठकीत प्रस्तावना करून मेळाव्याच्या निमित्ताने मराठा समाजाचे संगठन आणखी मजबूत करून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील सोईर-संबंध दृढ़ करण्याच्या दृष्टीने हा मेळावा लाभदायी ठरणार असल्याचे बोलून दाखविले. बैठक संपल्यानंतर सर्व समाज
बांधवांच्या वतीने मंगल कार्यालयाची पाहणी करून लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार आहे. बैठकीला प्रामुख्याने इंदौर, नेपानगर, खांडवा, ईच्छापूर येथील बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सदर बैठकीला दिनेश चौधरी, राजाराम कातोरे, महेश चौहान, प्रविण गुंजाळ, रामदास झुंजारके, काशिराम ढगे, इंदौर येथील कच्छ दादा, दळवी काका, संतोष पडोळ, मेघराजजी लांडे, अॅड. सत्यनारायण वाघ, नेपानगर येथील संजय पवार, गजानन कु-हाळे, बुलडाणा येथून जेष्ठ पत्रकार समाधान कु-हाळे पाटील, प्रा.भगवानराव कानडजे, प्रा. जगदेवराव बाहेकर , चंदू साखरे, नारायणराव गाढे, नारायणराव मिसाळ
आदी प्रामुख्याने उपस्थित होते.