लोहगाव ,दि . २२
तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावचे सुपुत्र भारतीय सैन दलातील जवान शाहूराजे भोसले यांची पदोन्नती होवून मेजर सुभेदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल जळकोट ग्रामस्थ व शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जवान भोसले हे सन १९९३ मध्ये भारतीय सैन्यात रुजू झाले असून त्यांनी इन्फंट्री स्कूल बेळगाव, महू अशा विविध ठिकाणी कर्तव्यात असताना पदे भूषविले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मेजर सुभेदार पदी त्यांची नेमणूक झाली आहे. सुभेदार पदी पदोन्नती झाल्यानंतर प्रथमच जळकोट जन्मभूमित आल्यावर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत नवगिरे, शिवनेरी मित्र मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सुरवसे, सेवानिवृत्त माजी सैनिक परमेश्वर कुंभार, धनराज रेणुके, सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब दळवी, काकासाहेब घुगे, लखन माने, पञकार सतिश पिसे, सुरेंद्र मोरे, सुनिल सुरवसे आदी ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते.