मुरुम,  दि. २२ 

कंटेकूर, ता.उमरगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत बुधवारी  दि.२२ रोजी निपुण भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय गणित दिन निमित्त महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन गणित शिक्षक लक्ष्मीकांत पटणे, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, ग्रामपंचायत सदस्या सौ. अनिता स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी  लक्ष्मण येवते यांनी गणितीय कोडे, कूटप्रश्न, बडबड गीते, रांगोळी, भौमितीक आकार, प्रश्नमंजुषा, बौध्दीक कोडे, व्यवहारातील गणित, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, गणितपेटी आदीविषयांवरती मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. लक्ष्मीकांत पटणे यांनी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी माहिती, गंमती-जंमती उपस्थितांना सांगितल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद जाधव, विठ्ठल कुलकर्णी, सौ.संध्या कलशेट्टी, बबिता निंबाळकर, कु. श्वेता कलमुले यांनी प्रयत्न केले. शिवकुमार स्वामी यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.
 
Top