जळकोट , दि.२२
थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामनुजम यांचा जन्मदिन वेगवेगळ्या उपक्रमाने जिल्हा परिषद प्रशाला , जळकोट येथे साजरा करण्यात आला. त्यामध्ये निबंध स्पर्धा,गणिती आकार,मॅजिक गणिती कोडी ,उखाणे व भाषण स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष शंकर वाडीकर , उपाध्यक्ष संतोष माळगे, शाळेच्या मुख्याध्यापक टोनपे , श्रीमती कांबळे पुष्पलता, तरमोडे प्रदीप, जाधवर हनुमंत , पटवारी वैभव, महेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा चालू असतानाच बीट विस्तार अधिकारी जी.एन.सर्जे यांनी आकस्मित भेट देऊन निबंध व भौमितिक रचना रांगोळी रेखाटनचे सुक्ष्म निरीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.