जळकोट,दि.२२ 


 गावातील मैदानी खेळाचे सर्वांनी पारंपारिक पद्धतीने जतन करावे .असे प्रतिपादन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मानमोडी येथे केले .                                           

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानमोडी येथे राज्यस्तरीय लाठी  स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी लाठी या पारंपरिक खेळाचे जतन व्हावे. अशी भावना  व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील,  पंचायत समिती सभापती रेणुकाताई इंगोले, भिवाजी इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद भोसले, उपाध्यक्ष शुभांगी  सुरवसे ,मुख्याध्यापक विक्रम पाचंगे ,रमेश दूधभाते, रामकृष्ण मोहिते ,अशोक राठोड ,सुचिता चव्हाण, राहुल कदम, राजेंद्र चौगुले ,गोटू कदम ,पिंटू गुंजकर ,शिवराम सुरवसे, ईश्वर गुंजकर, संदिपान गुंजकर, शिवाजी पवार ,संजय कदम ,भास्कर सुरवसे, विनोद आडे , पिंटू थोरात .

 या कार्यक्रमात कवयत्री कविता पुदाले यांच्या दीपस्तंभ संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  मुख्याध्यापक विक्रम पाचंगे यांना व संभाजीनगर जळकोट येथील सहशिक्षिका महादेवी रेणुके यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
 
Top