जळकोट, दि.२२


तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील पत्रकार किशोर धुमाळ यांचा भाजपा मीडिया सेलच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळकोट ग्रामविकास आघाडीच्या वतीने धुमाळ याःचा  सत्कार करण्यात आला . 



किशोर धुमाळ हे तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची सोडवणूक व्हावी. याकरिता ते वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या लेखणीतून व्यथा मांडतात. त्यांच्या कार्याची दखल घेत तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना एका नियुक्ती पत्राद्वारे धुमाळ  यांची मीडिया सेलचे तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे . 


त्यांच्या निवडीची दखल घेत जळकोट ग्रामविकास आघाडीचे प्रमुख तथा भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के यांनी धुमाळ यांचा यथोचित सत्कार केला . याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य संजय माने, सतिश राठोड , रिपाई युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे , एस. के. गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड ,रोहित कदम, गणेशराव सोनटक्के  तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top