तुळजापूर ,दि . २९ :
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेस कोल्हापूर येथील अँड सुधीर शशीकांत चव्हाण या देविभक्तने मंगळवार दि .२८ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन श्रीतुळजाभवानी देविचरणी चांदीची तलवार अर्पण केली.
कोल्हापूर येथील रहिवासी असलेले अँड सुधीर चव्हाण कै सदाशिव दिनकर राऊत यांच्या स्मरणार्थ 1920.290मिली ग्रँम वजनाची हुपरी येथे बनवुन घेतलेली सुमारे पंचाहत्तर हजार रुपये किमतीची चांदीची तलवार अर्पण केली.
तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर येथील देविभक्त लक्ष्मी विठ्ठल सिद्धांत यांनी श्रीदेवीजींस रोख एक लाख रुपये रोख देणगी दिली आहे. यानिमित्ताने या भक्ताचा मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मंदिर कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.