वागदरी , दि . ३०
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ,मुंबई शाखा किल्लारी तर्फे उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणाऱ्या सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना देण्यात येणारा "राज्यस्तरीय बेरोजगार मुक्त युवा पुरस्कार "तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील सहशिक्षक तथा ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांना जाहीर झाला आहे.
मुंबई येथील प्रथम फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देशातील सर्वच राज्यात विविध विषयावर 1994 पासून काम आहे. मराठवाड्यातील वाढती बेरोजगारी निर्मूलनासाठी सदर संस्थेच्या माध्यमातून किल्लारी केंद्रामार्फत मोफत ऑनलाईन व ऑफलाईन कौशल्य विषयक प्रशिक्षणव व रोजगार मिळवून देण्यात येते.विद्यार्थी तसेच बेरोजगार युवक - युवती यांच्या साठी विविध प्रशिक्षण व व्याख्यानाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्याचे काम ज्ञानकिरण सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत असून या कार्याची दखल घेत प्रथम फाउंडेशने भैरवनाथ कानडे यांची सदर पुरस्कारासाठी निवड झाली असुन किल्लारी येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे प्रथम फाऊंडेशनचे केंद्रप्रमुख सदाशिवराव साबळे व जिल्हा समन्वयक सुमित कोथिंबिरे यांनी कळविले आहे. यापूर्वी कानडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय संत रविदास संस्था पुरस्कार ,केंद्र शासनाचा नेहरू युवा पुरस्कार व अन्य संस्था-संघटनांच्या वतीने विविध पुरस्कार मिळालेले आहे.सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.