तुळजापूर, दि.३०:
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तिन्ही भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने वांड:मय मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले, याप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून राजकुमार धुरगुडे, प्रसिद्ध उद्योजक , तुळजापूर यांनी वरील उदगार काढले,
धुरगुडे बोलताना पुढे म्हणाले की, साहित्य निर्मितीमधुन आत्मिक सुखाची प्राप्ती होते,त्यातुन माणसाला माणूसपणाची शिकवण मिळते, जिवनातील अनुभव हा माणसाचा खरा गुरू असतो,इतरांनी केलेल्या निंदेचे भांडवल करून जिवनाची सकारात्मक जडणघडण होत असते.आपल्या सभोवताली जे वातावरण असते त्यातुन सुध्दा कांहीं चांगल्या बाबींचा अंगीकार करणे गरजेचे असते, जिद्द नसलेल्या व्यक्तीला आयुष्यातील ध्येयाची प्राप्ती होत नाही, शेवटी मानव सेवेतच ईश्वर असतो असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाच्या निमित्ताने याप्रसंगी राजकुमार धुरगुडे यांनी महाविद्यालयास कांहीं ग्रंथ ही भेट स्वरुपात यावेळी दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर म्हणाले की, साहित्यिक विचारांमधुन मानवास जिवन संजिवनी प्राप्त होत असते,काव्य रचनेतुन कवि स्वत: बरोबरच इतरांच्या भावना देखील व्यक्त करत असतो, साहित्य ज्वलंत प्रश्नांवर असावे, साहित्य जळणारे नव्हे तर उजळणारे असावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.संतोष राजगुरू, इंग्रजी विभाग प्रमुख,कला वाणिज्य महाविद्यालय,माढा हे म्हणाले की, आधुनिक काळात भाषा कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे, मातृभाषेबरोबरोच इतर भाषा सुध्दा आत्मसात कराव्या लागतील,आजची पिढी ही ऐकण्यात खुप कमी पडत आहे,आपण श्रवण कौशल्य आत्मसात केल्याशिवाय आपल्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होणार नाही,भाषा शिक्षण प्रक्रियेत भाषेचे व्याकरण गृहण करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ एस एम देशमुख यांनी साहित्यिक विचारांमधुन सामाजिक दृष्टीकोणाचा विकास होत असतो असे सूतोवाच केले.यावेळी डॉ ,मेजर वाय.ए.डोके यांची प्रमुख उपस्थिती होती,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सोहन कांबळे यांनी व आभार प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी मानले.सदर प्रसंगी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.