तुळजापूर ,दि . ३१ : 

 तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  गुरुवार  दि. ३०  डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता  पालक मेळावा आयोजित करून शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तथा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पालकांच्या संमतीने  निवड करण्यात आली .

 विद्यमान अध्यक्ष  गाटे शाम किसन हे सलग तिसऱ्यांदा (हॅट्रीक) अध्यक्ष पदाचे मानकरी ठरले आहेत . उपाध्यक्ष पदी सौ. सारिका विठ्ठल चव्हाण यांची   " बिनविरोध" निवड झाली आहे . शालेय व्यवस्थापन समितीत एकूण १६ सदस्य असून त्यात  ५० टक्के महिला सदस्य आहेत .



निवड करण्यात आलेली शालेय व्यवस्थापन समिती

अध्यक्ष  गाटे शाम किसन ,उपाध्यक्ष सौ सारिका विठ्ठल चव्हाण ,  सदस्य  गाटे आनंद बबन, सौ ज्योती शहाजी पवार ,ज्ञानेश्वर हनमंत सिरसाट ,वैष्णवी समाधान अंधारे ,रविंद्र दादाराव अंधारे ,अश्विनी सोमऩाथ माळी ,दिनकर बब्रुवान मारुती ,भाऊ डोलारे ,राधिका तानाजी.गायकवाड , राहुल अनिल.शिंदे, आण्णासाहेब बाबुराव दाटे ,किशोर अऱुण जाधव,  तुपेरे भारती सोपान ,सचिव सोनवणे पांडुरंग शहाजीआदी.

यावेळी सहशिक्षिका साठे सविता पांडुरंग , कदम अनिषा रामकृष्ण   सय्यद समीना रज्जाक यानी पुढाकार घेतले.
 
Top