उस्मानाबाद , दि . ३१: जुबेर शेख
सोलापूर औरंगाबाद महामार्गावर भरधाव कंटेनर व कारच्या भिषण आपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे. हा आपघात सरत्या वर्षी शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान झाल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकानी सांगितले.
उस्मानाबाद जवळील आळणी येथे शुक्रवार दि. ३१ डिसेंबर रोजी भीषण अपघातात 4 जन जागीच ठार झाल्याची घटना घडली असून कंटेनर व चारचाकी गाडी समोरासमोर जोरदार धडक होवुन आपघात झाला आहे . हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे . अपघातग्रस्त गाडी MH 24 AA 8055 मधील 4 जन ठार झाले असून गाडी लातूर येथील असल्याचे समजते . पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास व मदत कार्य सुरु करण्यात आले आहे .