तुळजापूर : 

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यां पुतळ्याची कर्नाटक येथे विटंबना केलेल्या आरोपीच्या बाजू घेणाऱ्या व बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक चा मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून तुळजापूर शहरामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या व संतप्त मराठा बांधवांच्या वतीने वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा  पुतळा जाळण्यात आला. चौकामध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके अर्जुन आप्पा साळुंके जीवन राजे इंगळे शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम उपजिल्हाप्रमुख श्याम पवार शंकर लोंढे नितीन जत्ते अण्णासाहेब शिरसागर शिंदे विकास वाघमारे अजय साळुंखे आबा कापसे महेश गवळी कुमार टोले औदुंबर जमदाडे व इतर मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top