कळंब , दि . १९


उस्मानाबाद  जिल्हा परिषदेमार्फत जायफळ, ता.कळंब येथे मुलींना सायकल वाटप करण्यात आले. तसेच ईश्वरी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे उदघाटन संपन्न झाले.

श्री हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आढावा बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. गावातील प्रलंबित कामांना निधी उपलब्ध करून सदर कामे आपण मार्गी लावणार आहोत.

यावेळी जि.प.महिला व बालकल्याण सभापती सौ.रत्नमाला टेकाळे,  पंडीतराव टेकाळे,   लक्ष्मण देशमुख,  बद्रीनारायण धुप्पाधुळे,   रमेश पाटील,  गुरुनाथ गाढवे,   रामलिंग धुप्पाधुळे, गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
 
Top