काटी , दि . २४

 तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे शुक्रवार दि. 24 रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन बिनविरोध करण्यात आले. याबद्दल आज शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


 व्यवस्थापन समिती अध्यक्ष  मल्हारी हनुमंत बोबडे, उपाध्यक्ष सुनील मोहन जाधव यासह सदस्य  राजेंद्र पारवे, संतोष शिंदे, सारिका देडे, जयश्री सुरवसे, राजकन्या भालेकर, अनुसया बनसोडे, सुरेखा भोसले, पूजा मुळूक, शिक्षणतज्ञ सूर्यकांत मुळूक, ग्रामपंचायत सदस्य नागेश बनसोडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी संध्याराणी ताटे व कृष्णा टकले यांचा सत्कार करण्यात आला. 
मागील सहा वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिले व शाळेच्या विकासात मोलाचे सहकार्य केले असे माजी अध्यक्ष जगन्नाथ उत्तम शिंदे (पाटील) यांचा ही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 
      

 यावेळी सरपंच नागेश बनसोडे, जगन्नाथ शिंदे यासह प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भारत कांबळे तर प्रमुख पाहुणे सरपंच नागेश बनसोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक ढोणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद चौधरी यांनी तर आभार श्रीमंत टेंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धोंडिबा गारोळे, रामचंद्र शिंदे व राजकुमार घोडके यांनी परिश्रम केले.
 
Top