ताज्या घडामोडी



तामलवाडी ,दि .२४

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्तखनन केले जात असून नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होताना दिसून येत आहे. गौण खनिज विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या परिसरात मुरुम उपसा करणारी मोठी टोळी कार्यरत झाली असून सुपारी घेऊन मुरुमाचे उत्तखनन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 



तामलवाडी गावाजवळील गंजेवाडी रोड लगत असलेल्या साठवण तलावातून जेसीबीच्या सहाय्याने मुरुमाचे उत्तखनन करुन वार्ड क्रमांक 1 मधिल मशिदीशेजारी सुरु असलेल्या बांधकामावर जेसीबी क्रमांक एम.एच- 25 ए.स - 3420 या मशीनच्या सहाय्याने अंदाजे 20 ते 25 पंचेवीस ब्रास मुरुम सपाट करत असल्याचे तामलवाडी महसूली सज्जाच्या तलाठी आशु राजमाने यांच्या निदर्शनास आले असून त्यांनी स्थळ पंचनामा केला असून दोषीं व्यक्तीवर काय कारवाई होणार ? की नेहमी सारखे हेही प्रकरण दाबले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
Top