वागदरी , दि .२५ : एस.के.गायकवाड

येडोळा ता.तुळजापूर येथे दि.3 जानेवारी२०२२ ते ९जानेवारी२०२२ दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.



  प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथील समस्त ग्रामस्थ भाविक भक्ताच्या वतीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.दि ३जानेवारी २०२२रोजी या पारायण सोहळ्याची विधीवत सुरुवात होणार आहे. दि.३ जानेवारी ते ९ जानेवारी २०२२दरम्यान प्रवचन ,हरीभजन,किर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले  असून ह.भ.प.महेश महाराज माकणीकर,राम गायकवाड महाराज चिकुंद्रा, माऊली महाराज मेडसिंगा,गोपाळ वासकर महाराज पंढरपूर,प्रल्हाद सरडे महाराज नांदुरी, फुलचंद महाराज रिंगणीकर आदींचे किर्तन होणार आहे तर परिसरातील वागदरी, नळदुर्ग, चिकुंद्रा, लोहगाव,शहापूर, गुजनुर, किलज, नंदगाव,चव्हाणवाडी, हिप्परगा (रवा), गुळहळ्ळी,चिवरी,होर्टी,जेवळी,शिरगापूर आदी गावातील भजनी मंडळाच्या हारीभजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर भाविक भक्तानी या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहवे आसे आवहान आयोजक ग्रमस्थानी केलेआहे.
 
Top