अचलेर, दि .६
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रकाश लोखंडे,जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सुभाष बलसुरे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची) येथे सहशिक्षिका रेखा पटवारी ,जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक रामचंद्र गिरी ,विद्या विकास हायस्कूल शाळेत प्रा.डॉ.विनोद पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.तर भीमनगर येथील बुद्ध विहारात सर्व बौद्ध उपासक, उपासिका यांनी एकत्र जमून बाबासाहेबांना अभिवादन केले व सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण केले.