जळकोट, दि.२४ : मेघराज किलजे

सातारा येथे राज्यस्तरीय दि.  २५, २६ डिसेंबरला मराठी भाषा चिंतन शिबीर या शिबिरास येण्याचे आवाहन  मराठवाडा संघटक  अभिमन्यू कदम ,
माय मराठी अध्यापक संघ यांनी केले आहे.



महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी भाषा शिक्षकासाठी माय मराठी राज्य अध्यापक संघाचे वतीने राज्यस्तरीय ‘मराठी भाषा चिंतन शिबिर दि.२५व २६ डिसेंबर रोजी सातारा येथे संपन्न होत आहे. 
     
सातारा येथीलपुणे – बंगलोर महामार्गावरील वाढे फाट्यावरील  यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या टेक्निकल कँम्पस मध्ये दि.२५ ,२६ डिसेंबर या दोन दिवशीय राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराचे अध्यक्षस्थान नाशिकचे सुप्रसिध्द कवी प्राचार्य लक्ष्मण महाडिक भूषविणार आहेत. 


शनिवार दि.२५ डिसेम्बर रोजी सकाळी अकरा वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका लक्ष्मणराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होईल.या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणव अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे ,पुणे येथील अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर , सातारा जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तर या चिंतन शबिराचे स्वागत अध्यक्ष सातारा येथील  यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, सातारा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे भूषविणार आहेत. 



याप्रसंगी कवी प्राचार्य लक्ष्मण महाडिक
आपल्या अध्यक्ष भाषणातून मराठी भाषेचा प्रवास, भाषिक स्थित्यंतरे,मराठी भाषेचे स्वरूप, चिंता आणि चिंतन, मराठी भाषेपुढची नवी आव्हाने, भाषा विकासात वाचन चळवळीचे महत्व, तसेच मराठी अध्यापकाचे स्थान, भाषेचा अभ्यासक्रम आणि क्रमिक पाठ्यपुस्तके, अध्यापन व मूल्यमापनातील नवे बदल तसेच  नवीन शैक्षणिक धोरण या सारख्या मुद्यांना स्पर्श करणार आहेत.उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी २ ते ३ या पहिल्या सत्रात निवृत्त शिक्षण उपसंचालक व सुप्रसिध्द कथाकथनकार मा. श्री. मकरंद गोधळी हे  ‘वाचिक अभिनय तंत्र आणि मंत्र’ याविषयावर विचार मांडणार आहेत.तर प्रा. अनिल पाटील (सांगली ) हे ‘मराठी भाषा सक्तीचा अधिनियम सद्यस्थिती ’या विषयावर मनोगत व्यक्त करतील . दुपारी ३ ते ४ दरम्यानच्या दुसऱ्या सत्रात  पसायदान या विषयावर सुप्रसिध्द प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख संवाद साधतील. दुपारी ५ ते ७ च्या तिसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रा. प्रदिप पाटील (इस्लामपूर)यांच्या अध्यक्ष तेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन होईल .


त्यात कवी  प्रा. वैजनाथ महाजन,कवी वसंत पाटील,कवयित्री सौ. मनिषा पाटील व इतर कवी सहभागी होतील. रविवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११ .३० पहिल्या सत्रात पुणे येथील माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व अंभेरी शिवधामचे आचार्य शिवानंद भारती यांची प्रकट मुलाखत प्रा. अनिल बोधे व डॉ.प्रिया निघोजकर घेतील. ११.३० ते १२.३० दुसऱ्या सत्रात ‘नवे शैक्षणिक धोरण २०२०’या विषयावर  प्रा. डॉ. सुफिया शिकलगार विचार मांडतील . १२.३० ते १.३० या तिसऱ्या सत्रात  संघाचे विश्वस्त  हनुमंत कुबडे हे ‘ मायमराठी राज्य अध्यापक संघाची भविष्यातील वाटचाल ’या विषावर विचार मांडतील. दुपारी २.३० ते ३.३०चौथ्या सत्रात प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे ह ‘मराठी भाषा साहित्य एक सांस्कृतिक अनुबंध ’या विषयावर विचार मांडतील .त्यांतर पुणे येथील शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  पहिल्या मायमराठी राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराचा समारोप होईल. तरी या राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराला मराठी भाषा शिक्षकांनीकोव्हीड नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन हनुमंत कुबडे(खेड) ,लक्ष्मण महाडिक (नाशिक ) व्दारकानाथ जोशी,(औरंगाबाद )अनिल बोधे,(सातारा )रमाकांत देशपांडे,(बीड ) अशोक तकटे, ज्ञानदेव दहिफळे जगन्नाथ शिवले,(पुणे) विलास पाटील(चोपडा ) अशोक मार्कंड ,अमृता कविश्वर (नाशिक )सौ. सुनिता पाटील)(सांगली ) भिकाजी कुलकर्णी( सोलापूर ) सौ. अलका बोर्डे(* अकोला ) संतोष पाटील(धुळे) जयश्री गिते(शेगाव ) मनिषा घेवडे(मुबई )आदीसह  राज्य कार्यकारणी मंडळाच्या सदस्यांनी केली आहे.
 
Top