काटी , दि . २३ :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशन मार्फत तामलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या 27 गावातील ग्राम सुरक्षा दल यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी व इतर महत्त्वाच्या माहिती व सुरक्षा विषयी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, ग्राम सुरक्षा दल, ग्रामस्थ यांच्यासाठी शुक्रवार दि. 24 रोजी सकाळी दहा वाजता येथील सरस्वती मंगल कार्यालयात प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबीरात तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित राहणार असून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण शिबीरात तामलवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलातील सदस्य व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तामलवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन पंडीत, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांनी केले आहे.