नळदुर्ग , दि . २३
शहरातील एक आदर्श शिक्षक कै. संजय रमेश दळवी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.२५ डिसेंबर रोजी नळदुर्ग येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अभिषेक सुरवसे यांनी केले आहे.
नळदुर्ग येथील प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व एक आदर्श शिक्षक कै. संजय रमेश दळवी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन २५ डिसेंबर रोजी आहे. यानिमित्त नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी (मोफत रक्तातील साखर तपासणी) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये डॉ. प्रशांत इंगळे (MS स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ),डॉ. सिद्धांत गांधी (ह्रदय रोग तज्ञ),डॉ. उमेश झिले (MD बालरोग तज्ञ),डॉ. राहुल मेडीदार (DNB मधुमेह तज्ञ),डॉ. जितेंद्र पाटील (BAMS PGDEMS Pune),डॉ. अपर्णा इंगळे (MD पंचकर्म),डॉ. महेश शिंदे (जनरल फिजीशीयन अँड सर्जन),डॉ. समीर शेख (MBBS D. Ortho ऑर्थोपेडीक सर्जन मुंबई),डॉ. सुरज शेख (MS शल्य जनरल सर्जन पुणे),डॉ. विवेक मुळे (जनरल फिजीशीयन) हे तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत. या शिबिराचे उदघाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे, सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, बाराबलुतेदार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष कल्याण दळे, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाचे डॉ. रमाकांत जोशी, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत व माजी नगराध्यक्षा मंगलताई सुरवसे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिषेक सुरवसे यांनी केले आहे.