वागदरी , दि . २३ :एस.के.गायकवाड


वागदरी ता.तुळजापूर येथे गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशिबा महाराज गुरव यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 
  

गुरव समाज मंडळ वागदरी व ग्रामस्थांंच्या वतीने येथे श्री संत काशिबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अँड.अमोल पाटील हे होते.
   
प्रारंभी श्री संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना आभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अमोल पाटील म्हणाले की, संत काशिबा महाराज व संत सावता माळी हे समकालीन संत असून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले आहे.  त्यांनी घालून दिलेला वारकरी संप्रदायाचा वारसा आपण जोपासने ही काळाची गरज आहे.


या प्रसंगी प्रा.डॉ.गणेश बिरजदार ,ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार ,दत्ता सुरवसे आखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेश बिराजदार , युवा आघाडी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, बाळासाहेब बिराजदार, नंदकुमार बिराजदार, ज्ञानेश्वर वामन बिराजदार, गुरव समाज मंडळ वागदरीचे अध्यक्ष लक्ष्मण बिराजदार ,उपाध्यक्ष गणेश बालाजी बिराजदार आदीसह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top