जळकोट, दि. २३

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानमोडी येथील विद्यार्थ्यांनी नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टयांग सोडो २०२१-कोरियन कराटे या दोन दिवसीय शिबिरात सहभाग घेतला. यामध्ये विवेक किरण गुंजकर ,वैष्णवी किरण गुंजकर, आर्यन भास्कर सुरवसे ,स्नेहा महादेव कदम ,आर्यन विनोद आडे ,यश दिनेश राठोड, प्रसाद दिनेश राठोड या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. 


या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक तथा लाठी असोसिएशनचे पंच विक्रम पाचंगे ,कोऑर्डिनेटर मोहम्मद रफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले. मानमोडी शाळेच्यावतीने या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश दूधभाते, रामकृष्ण मोहिते, श्रीमती सुचिता चव्हाण व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top