तुळजापूर , दि . २३ :
तुळजापूर येथिल स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या वतीने लावण्यात येणारे दोन ई रिक्षा व आरओ प्लॅन्ट मशिनरीसाठी ९.२० लाख रुपयांचा धनादेश बुधवार रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अजयकुमार सिंह, चिफ जनरल मॅनेजर यांच्या हस्ते श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे चिफ जनरल मॅनेजर अजयकुमार सिंह व त्यांच्या पत्नी नम्रता सिह, डेप्युटी जनरल मॅनेजर अकुला श्रीनिवास, उस्मानाबाद जिल्हयाचे रिजनल मॅनेजर विलास शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व प्रमुख अतिथींचा शाल, पुष्पगुच्छ , स्मृतिचिन्ह व आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास श्रीमती योगिता कोल्हे तहसीलदार मंदिर संस्थान यांची सुद्धा उपस्थिती होती. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चिफ जनरल मॅनेजर अजयकुमार सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे सुरु असलेल्या धार्मिक सामाजिक, शैक्षणिक सेवेचे कौतुक केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती योगिता कोल्हे यांनी केले.
यावेळी मिलींद जरीपटके (मुख्य प्रबंधक), बालाजी बस्तेवाड (मुख्य प्रबंधक), कल्पेश घोडके (शाखा प्रबंधक), निखील लिमकर (शाखा प्रबंधक), महेश हरमन, दिपक सिंग, सुमित ओक, नितीन शिंदे आदी उपस्थित होते.