उमरगा, दि . २३ :
महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यांचे नागपुर येथे १८ व १९ डिसेंबर रोजी त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात आले. अधिवेशनात सन २०२२-२०२४ साठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
उस्मानाबाद मंडळ अंतर्गत उमरगा, लोहारा तुळजापूर विभागीय अध्यक्ष पदी अमोल पाटील(पवार) उमरगा, सचिव पदी श्याम अबाचणे,उमरगा,संघटन मंत्री सचिन डोंगरे ,तुळजापूर, कोषाध्यक्ष पवन गुरव येणेंगुर, प्रसिद्ध प्रमुख गगन रणखांब उमरगा यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.