लोहारा , दि . २३
शहरातील हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर येथील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे गुरुवारी दि.२३ मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उदघाटन करण्यात आले.
या स्पर्धेत झटपट चार -चार ओहरच्या सामने खेळवले जाणार असून एकूण ६२ क्रिकेट संघाने सामने खेळण्यासाठी आयोजकांकडे नोंदणी केली कुठे आहे या स्पर्धेतील विजेत्या संघास येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश कोकणे यांच्यातर्फे ३१ हजार रुपये रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक के. डी. पाटील व वीरभद्र फावडे यांच्यातर्फे रोख रक्कम २१ हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक जे. के. कंपनीतर्फे रोख रक्कम १५ हजार व चषक तर चतुर्थ पारितोषिक नाना पाटील यांच्यातर्फे ७ हजार रुपये व चषक यासह विविध हजारो रुपयांची वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यावेळी जालिंदर कोकणे, नित्यानंद नारायणकर, जनक कोकणे, उज्वला गाटे, गणेश कुंभार, सतीश ढगे, वीर फावडे, दिनेश गरड, शशांक पाटील, राजपाल वाघमारे, प्रसाद जट्टे, परमेश्वर मुळे, ईश्वर बिराजदार, सचिन माळी, सचिन पोतदार, संतोष वाघमारे, दयानंद स्वामी, अमोल रोडगे, रफिक गंजीवाले, बिलाल सुंबेकर, किरण पाटील, अनिल येल्लोरे, विजय जाधव, विनोद जाधव, गोटू मुळे, शंभुलिंग स्वामी, मनोज लोहार, ओम पाटील, सुवन डोकडे, सुनील शिंदे, सुशांत माशाळकर, अक्षय रोडगे, कपिल स्वामी, विशाल कोकणे, अतुल रोडगे, गिरीष जट्टे,ओंकार जट्टे,गणेश स्वामी,गोपाळ सुतार सर,केदार जट्टे, महेश चपळे, स्वप्नील स्वामी यांच्यासह आदी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.